ए आजी मी तुझ्याशी खेळेन गं…

हंड्यावरती तपेलं, चुलीवरती पातेलं
तुझं माझं घरकुल मांडीन गं ||१||

दाण्याचा लाडू, गुळाची पोळी
पोह्यांचा भात तुला शिकवीन गं ||२||

भराभरा जेवीन, ऑफिसला जाईन
येताना खाऊ तुला आणीन गं ||३||

रात्र करू मामाची, गोष्ट सांगू राजाची
तुझ्या कुशीत मी झोपेन गं ||४||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *