काकडी गं काकडी, मान तुझी वाकडी
वाकडी तर वाकडी ,तरी मी फाकडी
भोपळेशेटचा गोल मोठ्ठा, त्यात नुसता बियांचा साठा
गाजर आले नेसून लुंगी, वाजवू त्यांची छान पुंगी
टोमॅटोचे गालच लाल, हातात घ्याल तर खाऊन टाकाल
कोथिंबिरीची नुसतीच कडी, नेसून आली हिरवी साडी
गरीब बिचारी मिरची म्हणते, सांगा कधी मी तिखट बोलते
जमवून साऱ्या भाज्यांचा अड्डा, अध्यक्ष झाला कोबीचा गड्डा