प्रणाम प्रभुजी तुला ।
आमचा, प्रणाम प्रभुजी तुला ।।

सूर्य चंद्र जणू दिवे विजेचे ।
लटकती तारे कसे मजेचे ।
वीज नभातून तुला मिळे का ।।
प्रणाम प्रभुजी तुला…

पाऊस पडूनी शेते पिकती ।
माती मधूनी निघती मोती ।
सांभाळीशी मुला फुलांना ।।
प्रणाम प्रभुजी तुला…

शक्ती बुद्धी आम्हा द्यावी ।
देश आमुचा सुखात ठेवी ।
हेच मागणे तुला आमुचे ।।
प्रणाम प्रभुजी तुला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *