सर्कस वाला आला हो सर्कस वाला… २
दाखवा तिकीट चला चला
तंबू मध्ये बसा चला,
खेळ सुरू झाला हो खेळ सुरू झाला
सर्कस वाला आला हो सर्कस वाला… २

हे तर आले कोण हो
लांब्या ढांग्या टाकीत हो
उंच उंच मान हो
उंट दादा आला हो उंट दादा आला
सर्कस वाला आला हो सर्कस वाला… २

हे तर आले घोडेस्वार
टप टप घोडा चालविणार
चाल यांची डौलदार
रिंगणात आला हो रिंगणात आला
सर्कस वाला आला हो सर्कस वाला… २

लुकलुक बघती हत्ती हो
सुपा एवढे कान हो
हलविती सोंड हो
सलाम करती तुम्हाला हो सलाम करती तुम्हाला
सर्कस वाला आला हो सर्कस वाला… २

फिरतो हाती घेऊन काठी
विदूषकाची ऐटच मोठी
मध्येच मारी हा कोलांटी
खेळ खल्लास झाला हो खेळ खल्लास झाला
सर्कस वाला गेला हो सर्कस वाला गेला… २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *