दादा गेले नारळ आणायला,
नारळ आणायला,नारळ आणायला …२
तीन रुपयाला एक नारळ …२
दोन रुपयाला दे रे बाबा,
दे रे बाबा, दे रे बाबा
दादा जा मुंबईला
दादा गेले मुंबईला,
मुंबईला, मुंबईला
दोन रुपयाला एक नारळ …२
एक रुपयाला दे रे बाबा,
दे रे बाबा,दे रे बाबा
दादा जा कोकणात
दादा गेले कोकणात,
कोकणात, कोकणात
एक रुपयाला एक नारळ …२
फुकट दे रे माझ्या राजा,
माझ्या राजा, माझ्या राजा
दादा जा झाडावर
दादा चढले झाडावर,
झाडावर, झाडावर
धपकन पडले चिखलात …२
(शब्दातील बदल जाणीव पूर्वक केले आहेत)