चिव चिव चिमणी, गाते गाणी
खाते दाणा, पिते पाणी
बांधले घरटे, झाले उलटे
पडले पिलू, पाहते लिलू
लिलूने बोट लावले
पिलाने बोट चावले
लिलू लागली रडायला
ऊंSS ऊंSS ऊंSS ऊंSS
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
रव्याचा, खव्याचा
बुंदीचा, बेसनाचा
लिलू लागली हसायला.