अबब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई ।
आजोबांचे पोट सुद्धा एवढे मोठे नाही ।।
अबब ब ब ब ब ब ब काटे वरून खालून ।
एक दोन तीन चार अंकच गेले सरून ।।
अबब ब ब ब ब ब ब फोडणार कसा हो याला ।
डिंक डिंक डिंक डिंक सगळाच डिंक झाला ।।
अबब ब ब ब ब ब ब कोण सबंध खाईल ।
आजोबांच्या पोटा एवढे त्याचे पोट होईल ।।