किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला
इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला
दहा दिवसांसाठी येता, रोज गोड मोदक खाता
हवा वरून कशाला हो, घोट दुधाचा ?
इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला
रोज गोड खाऊन तुमचा, किडेल हो दात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात ?
साध्या वरण भाताची हो भिती कशाला ?
इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला
हळूच तुमच्या कानात सांगतो, एवढं माझं ऐका
तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका
मग नको कशाचीही भिती तुम्हाला
इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला
किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला
इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला