या रे या साऱ्यांनो या
नकलाकारांच्या नकला पाहा
आल्या हो शेजारच्या आजीबाई
कंबर ताठ होतच नाही
काठी टेकत धापा टाकत
बसे मुलांना गोष्टी सांगत
एक होता राजा,एक होती राणी
राजा गेला दूर,राणी गेली दूर
आंब्याच्या झाडाखाली झोपले ढाराढूर
या रे या साऱ्यांनो या…
आला हो गावचा पाटील बुवा
जरीचा फेटा बांधलाय पाहा
दिसेना कान, आहे मोठा मान
लाललाल चुटुक जोडा छान
या रे या साऱ्यांनो या…
आला हो देशाचा शूर शिपाई
चालण्याची ऐट पाहावी
एक डोळा मिटून नीट नेम धरून
दावीतसे हा बंदूक रोखून
ठो ठो ठो ठो ठो ठो
या रे या साऱ्यांनो या…