चांदोमामा घर तुझं लांब लांब लांब ।
पाय दुखतील चालून जरा थांब थांब थांब ।।

चालू नको गड्या इतका झप झप झप ।
लिंबोणीच्या झाडामागे लप लप लप ।।

लिंबोणीचे झाड आहे छान छान छान ।
तुझ्यासारखी माझी आई छान छान छान ।।

लिंबोणीचे झाड आहे छान छान छान ।
तुझ्या सारखा माझा बाबा छान छान छान ।।

तुझ्यासारखा चेहरा त्याचा गोल गोल गोल ।
भाऊ ना रे आईचा तू बोल बोल बोल ।।

तुझ्यासाठी खाऊ केला गोड गोड गोड ।
अळीमिळी गुपचिळी सोड सोड सोड ।।

(गाण्याच्या शब्दात जाणीव पूर्वक बदल केले आहेत)
Audio Player

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *