छोटे घरकुल, छोटे घरकुल
पण पाहा कशी मांडली आहे कोपऱ्यात चूल
चिमुटभर पीठ, चिमुटभर पीठ
पण पाहा कशा केल्या त्याच्या भाकऱ्या नीट
तांदूळ होते सात, तांदूळ होते सात
पण पाहा कसा केला त्याचा पातेली भर भात
घेतली पाने, घेतली पाने
पण सकाळ पासून आहे माझे सोने भुकेले
वाढले पिठले, वाढले पिठले
पण खरं सांगा तोंडाला ना पाणी सुटले