फिल्ड कोऑरडीनेटर म्हणून काम करण्याची संधी

‘बिलिफ’ विषयी:

‘बिलिफ’ ही एक सामाजिक संस्था असून ती गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करते. ‘आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो’ यावर बिलिफचा पूर्ण विश्वास आहे. संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र पुणे आहे. पुण्यातील काही अंगणवाड्यांसोबत बिलीफचे काम सुरू आहे.

पद: फिल्ड को-ओर्डीनेटर (Field Co-ordinator)

कामाचे स्वरूप
  • अंगणवाडी:नियमितपणे अंगणवाडीतील उपक्रमांचे निरीक्षण करून अभिप्राय देणे व निरीक्षणांच्या नोंदी ठेवणे. अंगणवाडीत प्रत्यक्ष उपक्रम घेऊन दाखवणे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सोबत वर्गातील उपक्रमांबाबत चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवणे.
  • पालक: पालकसभांना उपस्थित राहणे व पालकसभा घेणे. गृहभेटी करून मुलांसोबत बालशिक्षणाचे उपक्रम घेण्यास पालकांना मदत करणे. संस्थेच्या गरजेनुसार माहिती गोळा करणे.
  • प्रशिक्षण: वेगवेगळी प्रशिक्षणे, विविध स्तरावरील मिटिंग्ज यात सक्रिय सहभाग घेणे.
  • डॉक्यूमेंटेशन: नियमित अहवाल लिहिणे व हिशोब ठेवणे. आवश्यकतेनुसार प्रशासकीय कामे करणे. फिल्ड वरील कामाचे फोटो आणि व्हिडिओ यांचे संकलन करणे.
  • इतर:टीम सोबत संवाद साधून एकत्रित काम करणे व संस्थेच्या इतर कामांमध्ये सहभाग घेणे.
  • प्रवास: फिल्डवर्क हा कामाचा अविभाज्य भाग असून दररोज फिल्डवर (पुणे शहरात) जाणे आवश्यक आहे. कामासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी क्वचित पुण्याबाहेर प्रवास करणे आवश्यक आहे.
कामाचे ठिकाण: पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदव्युत्तर पदवी (शिक्षण, समाजकार्य किंवा संबंधित अभ्यासक्रमास प्राधान्य)

अर्जदाराकडूनच्या अपेक्षा
  • बालशिक्षण क्षेत्रात व वस्तीपातळीवरील संस्थेसोबत काम करण्याची आवड व अनुभव असल्यास प्राधान्य
  • संवाद कौशल्य
  • सामाजिक संस्थेत काम करण्याची आवड व त्यातून स्वतःची व संस्थेची उन्नती यावर विश्वास
  • सातत्याने नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर विश्वास
  • आव्हाने व अनिश्चितता यांना सामोरे जाण्याची क्षमता
  • टीम सोबत काम करण्याची आवड व क्षमता
  • मराठी भाषेवर प्रभुत्व
  • संगणक हाताळण्याचे ज्ञान (एम.एस ऑफिस, एक्सेल, इंटरनेट इ.)
  •  

    तुम्ही ‘बिलिफ’सोबत का काम करावे?
    • ‘बिलिफ’ संस्थेचे काम कसे चालते हे पाहता येईल व प्रत्यक्ष अनुभव घेता येईल
    • तज्ञ व्यक्तींकडून भरपूर शिकण्याची आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल
    • रचनात्मक काम करण्याचे समाधान मिळेल
    मानधन: 15000 ते 20000 प्रति महिना

    या पदासाठी इच्छुक असणाऱ्यानी sadhana.belief@gmail.com या मेलवर आपला CV  पाठवावा.