कृती – मुलाबरोबर बसा आणि मुलाला सांगा, तुझे हात दाखव. मुलाने हात दाखवले कि मग तुम्ही तुमचा हात दाखवून सांगा कि हा माझा हात.

मग मुलाला तुमच्या हाताचा पंजा म्हणजे बोटे असलेला भाग दाखवून सांगा कि याला हाताचा पंजा म्हणतात. काय म्हणतात? तू सांग. हाताचा पंजा. बरोबर परत एकदा सांग याला काय म्हणतात? असे विचारून पंजा असे म्हणून घ्या. आता मुलाला त्याच्या हाताचा पंजा दाखवायला सांगा. मुलाने पंजा दाखवला कि बरोबर असे म्हणा.
मग तुम्ही तुमच्या हाताचा पंजा वर खाली हलवून दाखवा. मुलाला पण त्याचप्रमाणे पंजा हलवायला सांगा.

यानंतर हाताची बोटे दाखवून सांगा कि, याला म्हणतात हाताची बोटे. काय म्हणतात? हाताची बोटे. आता तू सांग काय म्हणतात? असे विचारून मुलाकडून बोटे असे म्हणून घ्या. परत सांग काय म्हणतात असे म्हणून बोटे असे दोन तीनदा म्हणून घ्या. मुलाला तुम्ही तुमच्या हाताची बोटे हलवून दाखवा. मग मुलाला पण बोटे हलवायला सांगा. मुलाला बोटांकडे नीट बघ असे सांगा आणि प्रत्येक बोटाला कशी नखं आहेत हे दाखवा.
दोन्ही हाताच्या प्रत्येक बोटाला नखं आहे हे लक्षात आणून द्या.

याचप्रकारे पायाचे पाऊल म्हणजे एकदम खालचा भाग, ज्याच्यावर आपण उभे राहतो तो आणि पायाची बोटे यांची पण ओळख करून द्या.

यानंतर मुलाला खालील कृती करायला सांगा आणि प्रत्येक कृती करायला वेळ द्या. मुलाने एक कृती नीट करून दाखवली कि पुढची कृती करायला सांगा.
हाताचा पंजा हलवून दाखव.
आता हाताची बोटे हलवून दाखव. दोन्ही हात वर कर.
तुझी पाऊलं दाखव.
पायाची बोट दाखव.
खाली बस आणि पाऊले हलवून दाखव.

असे सांगून पंजा, पाऊल, बोटे ही नावे मुलाच्या लक्षात आली आहेत ना ते बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *